From blogs

छत्रपती शिवराय आमुचा श्वास

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Nov 01, 2021

छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरी मंत्रात प्रचंड ताकत व ऊर्जा आहे. जी वेळोवेळी आम्हाला अनुभवायला येते. त्यामुळे राजे शिवराय प्रतिष्ठान , पनवेल , नवी मुंबई यांनी आयोजित केलेल्या किल्ले "कुलाबा प्रतिकृती व जलपूजन" या कार्यक्रमास दिल्लीच्या व्यापातून वेळ काढत हजेरी लावली. माझ्या शिवरायांचा विषय तिथे मी असणारच...!

आष्टगाराचा राजा, हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची राजधानी ...आज दीपावलीचे औचित्य साधत किल्ले " कुलाबा " प्रतिकृती व जलपूजन आणि माझे " शिवराय आणि प्रशासन " या विषयावर व्याख्यान उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले. राजेंबद्दल काय बोलावे व किती बोलावे पण उपस्थित शिवभक्त शिवरायांना ऐकण्यासाठी अधीर होते. 

राजे शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना काळात हजारो रुग्णांना रक्तदान करून रक्त पुरवठा करण्यात आला. पुढाकार घेत अनेक रुग्णांना बेड उपलब्ध करुन जीवनदान दिले. प्रतिष्ठाण कडून किल्ले संवर्धना सारख्या अनेक मोहिमा सातत्याने राबविल्या जातात. ही दीपावली आदिवासी पाढ्यातील गरजवंतांना वस्त्र , फराळाचे साहित्य वाटप करुन साजरी करण्याचा मानस प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रशांत दादा ठाकूर , संस्थापक श्री. महेशजी पवळे, श्री.संजय पाटील , श्री प्रकाश गाढे ,सौ विद्याताई तामखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांची ऊर्जा घेऊन आपणही यावर्षीची दिवाळी सामाजिक भान ठेवून साजरी करूयात...