'आयुष्मान भारत' योजना


'आयुष्मान भारत' या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली होती.देशातील 40 कोटींहून अधिक नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष्य आह


आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा

  • वैद्यकीय तपासणी आणि उपचार
  • रुग्णालयात दाखल होणे
  • औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
  • रुग्ण देखभाल सेवा
  • क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
  • वैद्यकीय मलमपट्टी सेवा
  • आवास लाभ
  • अन्न सेवा
  • उपचारादरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशन्स चे उपचार
  • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलो अप
  • विद्यमान रोगावर उपचार


आयुष्मान भारत योजनेअंतर्गत येणारे काही आजार

  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
  • प्रोस्टेट कैंसर
  • करॉटिड एनजीओ प्लास्टि
  • Skull base सर्जरी
  • डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
  • Pulmonary व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
  • इंटिरियर स्पाइन फिक्सेशन
  • Laryngopharyngectomy
  • टिश्यू एक्सपेंडर


आयुष्मान भारत योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक BPL परिवारांचा समावेश केला जाणार आहे. योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. 2011 मध्ये जी कुटुंबे सूचीबद्ध आहेत त्यांचाही PMJAY योजनेत समावेश करण्यात आला आहे.


या योजनेंतर्गत औषधांचा व उपचाराचा खर्च शासन करणार असून 1350 आजारांवर उपचार केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. आयुष्मान भारत योजनेला जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांना उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता करावी लागणार नाही.



आवश्यक कागतपत्र

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • मोबाईल नंबर
  • पात्याचा पुरावा

आयुष्यमान भारत- मिशन महाराष्ट्र🚩 च्या प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारतीताई प्रविण पवार यांनी दिल्लीवरून रवाना होताना खास शुभेच्छा दिल्या .सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री मिलींदजी म्हैसकर व माझ्या समितीचे सदस्य सचिव तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त श्री धीरजकुमारजी यांनी देखील पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.. स्थळ - मुंबई