From blogs

नाशिक येथे मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Mar 13, 2024

सामान्य माणसांच्या उपचारासाठी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराच्या महायज्ञाला सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भरतीताई पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राहुल दादा आहेर होते. तर आ. राहुल डिकले, आ. सीमाताई हिरे , महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, भाजपा जिल्हाध्यक्ष केदारनाना आहेर , शहर अध्यक्ष गिरीष पालवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दि.१७ आणि १८ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या या शिबिराचा लाभ हजारो गरजू रुग्णांना मिळाला आहे. 

ना.भारतीताई पवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बलशाली नेतृत्वाखाली देश सदृढ व आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच उपेक्षित व वंचित घटकातील शेवटच्या व्यक्तीला पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे देशातील सामान्य माणूस पैशाअभावी आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेही ना.पवार म्हणाल्या. 

सदर शिबिरामध्ये हृदयरोग 2 डी इको तपासणी, डोळ्यांचा तिरळेपणा, मोतिबिंदू,अस्थिविकार, कॅन्सर, मेंदु, मणकेविकार तसेच इतर दुर्धर आजार आदी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया संबंधीचे आजार, लहान बालकांमध्ये आढळणारे आजार

यांची तपासणी करून त्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.