From blogs

सन्मान लसीकरण योद्ध्यांचा, कृतज्ञता दातृत्वाची

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Oct 20, 2021

कोरोना संक्रमण काळातील बिकट परिस्थितीत झोपडपट्टीतील तसेच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना अन्न धान्य पुरवठ्यापासून ते अनेक रुग्णालयास व्हेंटिलेटर, औषधी उपलब्ध करून गरजवंतांचे अश्रू पुसण्याचे काम रोटरी इंटरनॅशनल ने संपूर्ण राष्ट्रात केले. वंदनीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर त्याची उत्कृष्ठ नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून रोटरियन सदस्यांनी मौलिक कार्य केले. या सर्व योद्ध्यांचा सत्कार तसेच मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून 100 कोटी लसीकरणाच्या टप्प्याची पूर्तता म्हणून आज मुंबईतील सहारा स्टार हॉटेल मध्ये कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई प्रवीण पवार , रोटरी गोव्हर्नर राजेंद्रजी अग्रवाल , श्री अशोकजी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक दिवसानंतर सर्व पत्रकार बांधवांशी हास्य विनोद व दिलखुलास चर्चा झाली.