From blogs

उजळले भाग्य आता l अवघी चिंता वारली ll

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 23, 2024

उजळले भाग्य आता l 

       अवघी चिंता वारली ll

 

साक्षात पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकोबारायांनी वरील चार चरणाचा अभंग लिहिला. अगदी याच अभंगाची प्रचिती माझ्या जीवनात आली आणि धन्य झालो. कारण पाचशे वर्षाचा कलंकित इतिहास पुसत अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि या जन्माचे पुण्य आहे की, ' याची देही याची डोळा ' साक्षात प्रभूरामचंद्राचे सहकुटुंब दर्शन घेण्याचा योग जुळून आला.

    आजी सोनियाचा दिनु 

                वर्षे अमृताचा घनु 

     हरी पाहिला रे... हरी पाहिला ll 

मर्यादा पुरुषोत्तमाचे सावळे, सुंदर व मनोहर रूप डोळ्यात साठवून घेतले. कित्येक वर्षांची आस पूर्ण झाली. परम दयाळू श्रीरामाचे आशीर्वाद हे सत्कर्म व परोपकाराची प्रेरणा देतात. सनातन हिंदू धर्माची भगवी पताका अशीच फडकवत ठेवण्याची मनोकामना व्यक्त करत श्रीराम चरणी लीन झालो. आता कसलीही चिंता करण्याचे कारण नाही. 

प्रभू श्री रामचंद्रांचे आयुष्य हे आपल्याला त्याग सामर्थ्य मर्यादा प्रेम यांचे अनेक उदाहरण देणारे एक सुंदर महाकाव्य आहे श्री राम हे फक्त नाव नसून तो एक संस्कार आहे ती एक संस्कृती आहे जी आपल्याला शिकवते सर्वाना आपलेसे करणे जी आपल्याला शिकवते मानवतेचा खरा अर्थ जी आपल्याला अनुभूती करून देते कि सत्य हे किती सामर्थ्यशाली आहे रामचंद्रांच्या आयुष्याला त्यांच्या व्यक्तित्वाला भारतीय संस्कृती व सनातन धर्माचा पाय म्हटले तर काही वावगे ठरणार नाही प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या प्रमाणे आपल्या संपूर्ण आयुष्यात मर्यादांमध्ये राहून आपले कर्तव्य सर्वोपरी ठेवले अशा राघुनंदनाला मनात ठेऊन मी माझे समाज कार्य करत राहील 

मर्यादा पुरूषोत्तम सियावर रामचंद्र कि जय