From blogs

🔸महाराष्ट्र गुणगौरव ने सन्मानित...

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 09, 2023

डॉ कौतिक दांडगे साहेब यांच्या दादर येथील महाराष्ट्र बाजारपेठ या नामांकित व्यवसायाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार ने मला सपत्नी सन्मानित करण्यात आले. धर्मपत्नी शिल्पाची खास मैत्रीण सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर, अभिनेता नागेश भोसले ,अभिनेता दादूस, दिगंबर नाईक, तन्वी मुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. कौतिकराव दांडगे यांनी

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून येऊन महाराष्ट्राच्या राजधानीत आपला जम बसवला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये आपल्या कार्याची सात वर्ष पूर्ण करत डॉ दांडगे यांनी अनेक सर्वसामान्यांच्या हाताला ते काम देत आहेत. बाजारपेठ च्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पन्नास हजार माता-भगिनींना केवळ रोजगारच नाही तर उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे  राहवे यासाठी त्यांना व्यवसाय करण्याचे माध्यम व कौशल्य विकसित करण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने आज हा व्यवसाय रुपी वटवृक्ष अनेक कुटुंबांवर आपली सावली धरून उभा आहे. सर्वांचे कष्ट, मेहनत व योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मराठी माणसाची बाजारपेठ नावलौकिकास पात्र झाली आहे. राज्यातील एका नामवंत संस्थेच्या वतीने

महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं याचा मला सार्थ अभिमान आहे. नामवंत संस्थांच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला कौतुकाची थाप मिळते ती एक थाप तुम्हाला नवी प्रेरणा देत असते, असेच या पुरस्काराला कौतुकाची थाप समजत माझ्या वाट्याला आलेले समाजकार्य पूर्णत्वास नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी करेन. महाराष्ट्र बाजारपेठेला पुढील वाटचालीसाठी माझ्यावतीने शुभेच्छा.