From blogs

वसंत व्याख्यानमाला नाशिक २०२४

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 04, 2024

सात्विक रुग्णसेवा
श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक सारख्या ठिकाणी १०१ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या  वसंत  व्याख्यानमाला सारख्या लोकप्रिय व्यासपीठावर आपले मनोगत आणि कार्यप्रवास मांडत असताना जीवनातील अनेक महत्वपूर्ण असे डोळ्यात पाणी आणणारे, ओठांवर स्मित उमटविणारे, मनाला समाधान देणार तर कधी काळजाची लाही करणारे अनेक कडू गोड अनुभव डोळ्यासमोर उभे राहत होते. 

रुग्णसेवेला प्रेरणा देणाऱ्या माझ्या आयुष्यातील प्रसंग, नंतर पुढे मुख्यमंत्री सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून रुग्णसेवा करण्याची संधी मला लाभली. सामन्यांसाठी  काम करताना मला नेहमीच एक गोष्ट जाणवत राहिली, ती म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समाजाचे देणे लागतो, ते आपले काम नसून ते आपले कर्तव्य आहे असे मी समजतो.

दिल्लीला कर्तव्य बजावत असताना देखील मी आपल्या मातीशी असलेले नाते विसरलो नाही हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा आहे माझे संपूर्ण आयुष्य हे रुग्णसेवेसाठी समर्पित आहे. सामान्यांची मदत करण्यासाठी कायद्याची चौकट मोठी करणे, प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे असे मी मानतो. माणसे पदाने नाही तर कर्तृत्वाने मोठी असली पाहिजे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या प्रमुख पदी काम करत असताना, आपण जनसामान्यांच्या कामी येत आहोत, त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आपण उपयोगी येत आहोत, या गोष्टीचे मला समाधान आहे. आज मला वसंत व्याख्यानमाला सारख्या  व्यासपीठावर जिथे  पंडित जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, सारख्या थोर व्यक्तींनी ज्या व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. अशा ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळणे मी माझे सौभाग्य समजतो. हि नाशिकची संस्कृती आहे हे नाशिककरांची प्रेम आहे जे मी आशीर्वाद रूपाने स्वीकारतो. व्यासपीठावर बोलताना मी माझ्या जीवनपटावर बोलताना माझ्या कार्यप्रवासावर प्रकाश टाकताना, मला मिळालेल्या संधीचे मी सामान्यांसाठी फलित करू शकलो याचे मला समाधान आहे. वीर शैव यंगम यांच्या कडून करण्यात आलेला सत्कार मी एक प्रेरणादायी स्तुती समजून साकारतो व वसंत व्याख्यानमाला समितीच्या सर्व  कार्यकारी अधिकाऱ्याचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला हि संधी दिलीत. या प्रसंगी विजय कंकणकर, प्रणव पवार हे मान्यवर उपस्थित होते.