From blogs

आयुष्यमान भारत- मिशन महाराष्ट्र

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Nov 02, 2023

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंतप्रधान जन आरोग्य योजना अर्थात 'आयुष्यमान भारत'... हि जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन एक महत्वकांक्षी पाऊल उचलत आहे...माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यात #आयुष्मान_भारत_मिशन_महाराष्ट्र समिती गठीत करत आज शासन निर्णय निर्गमित झाला आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी आदरणीय साहेबांनी या समितीचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलीय.केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा योग्य समन्वय साधत “आरोग्य यज्ञाच्या“ पवित्र कार्यास प्रारंभ करत आहोत... सन २०१५ मध्ये मा. फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन झाला. या कक्षाची प्रथम जबाबदारी सांभाळण्याचं भाग्य मला लाभलं होतं. सदर कक्षाची जबाबदारी पार पाडताना जात, धर्म, पंथ, पक्ष हे कधीच आडवे येऊ दिले नाहीत...आता सुद्धा या पवित्र कार्यास त्याच पध्दतीने वाहून घेण्याची सदसदविवेकबुध्दी कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 

 

भारत सरकारची विश्वातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून ओळख असलेल्या #आयुष्यमान_भारत साठी काम करणे आव्हानात्मक असणार आहे. राज्यातील महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना ही दि २८ जुलै पासून नवीन स्वरूपात येत आयुष्यमान ( पंतप्रधान जन आरोग्य योजना)एकत्रित कार्यरत केली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री मा .मनसुख भाई मांडवीय आणि खास करून मला केंद्रीय मंत्रालयात स्वतःच्या खात्यात सहाय्यक सचिव म्हणून नियुक्त करून देशकार्याची संधी दिली अशा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांचा कायम ऋणी आहे.

महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त गरीब, गरजू रूग्ण लाभार्थ्यांपर्यंत, सर्वदूर लाभ पोहोचविण्याकरिता मी दिवस-रात्र मेहनत घेऊन या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारच... मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब,राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,मा.उपमुख्यमत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत साहेब यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचे सामर्थ्य परमेश्वर मला देवो ही प्रार्थना... सामान्यांच्या हृदयामध्ये देव बघण्याची आतुरता.. होय आम्ही पुन्हा आलोय... महाराष्ट्रातील सामान्यांच्या आरोग्य सेवेकरिता

जय भारत,जय महाराष्ट्र...