From blogs

आजादी का अमृत महोत्सव एक कदम स्वास्थ्य की और

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 14, 2022

आझादी का अमृत महोत्सवात नाशिक येथे 'वॉकेथॉन व योग शिबिरास' उदंड प्रतिसाद 

देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले त्या प्रित्यर्थ पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा होतोय.याचाच भाग म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक येथे महात्मानगर येथील मैदानावर 'वॉकेथॉन व योग शिबिराचे' आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच नाशिकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत तुडुंब गर्दी केली होती. सकाळी 6 वाजेपासूनच नागरिकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मोफत टी शर्ट देण्यात आला. नंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ भारतीताई पवार यांनी वॉकेथॉन च्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. नाशिककरांसह त्यांनी स्वतः यात आपला सहभाग नोंदवला.
त्यानंतर पुन्हा सर्वजण मैदानावर आले व वॉकेथॉन चा समारोप झाला. या कार्यक्रमात खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाला खास करून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अनेक सुंदर योगासने करून दाखवत उपस्थितांची मने जिंकली. ह्या सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनेक योग साधकांनी आपले कौशल्य दाखविले. या प्रसंगी बोलतांना ना.डॉ.भारतीताई पवार म्हणाल्या की, योग ही भारताची प्राचीन विद्या असून आपल्याला निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. निरोगी जीवन हेच स्वस्थ जीवन असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही आपण असेच कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही देऊन नाशिककरांचे व सहभागी सर्वांचे आभार ताईंनी मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची संधी मला मिळाली. नाशिक पुण्यनगरी योग नगरी म्हणून जगात प्रसिद्ध व्हावी व आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ नाशिक मध्ये व्हावे यासाठी आपण ताईंच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मी दिली. 

आजचा वॉकेथॉन व योग शिबिराचा कार्यक्रम हा देशभरात झालेल्या सर्वच कार्यक्रमात सरस झाला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

वॉकेथॉन यशस्वी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्था-संघटनांनी मोलाचे योगदान दिले. यात प्रामुख्याने BAPS स्वामीनारायण संस्था, ISKCON नाशिक, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन, सेवा साधना फाऊंडेशन, नववर्ष स्वागत यात्रा समिती, अनेक मेडिकल कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने SMBT, Motiwala, सप्तश्रृंगी आयुर्वेद इ. वैद्यकीय कॉलेज होते. नाशिक शहरातील सर्व महाविद्यालयांच्या एनएसएस चे संघ यात सहभागी झाले. सूर्या करिअर ॲकॅडमी च्या अनेक विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने अन्न व सुरक्षा मानक प्राधिकरण च्या संचालिका सौ.प्रिती चौधरी, सहसंचालक श्री.संजीव पाटील, यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हयाप्रसंगी आमदार सौ. सिमाताई हिरे, आमदार श्री.राहूल ढिकले, शहराध्यक्ष गिरीष पालवे, जिल्हाधिकारी गंगाधरनजी, उपजिल्हाधिकारी श्री गणेश मिसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री बागुल साहेब, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री रामदास हरळ , श्री किरण चव्हान ग्रेप काउंटी योग संशोधन केंद्र नाशिक,-नाशिक सायकल असोसिएशनचे प्रमुख श्री रविंद्र वानखेडे, सेवा साधना फाऊंडेशनचे सचिव दिपक भगत, प्रज्ञाताई पाटील प्रभारी योग प्रकोष्ठ व प्रीती त्रिवेदी संयोजक योग प्रकोष्ठ भाजप.

तसेच अनेक क्षेत्रातील अनेक गणमान्य आवर्जून उपस्थित होते.