From blogs

पद्मश्री पोपटराव पवारांचा सहवास व साहित्याची मेजवानी

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Mar 07, 2022

कालचा दिवस सार्थकी लावला

माझ्या जन्मभूमीत काल शिवार साहीत्य संमेलन पार पडले. उद्घाटनासाठी परमस्नेही पोपटराव पवार आवर्जून उपस्थित होते.त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांचा हृदय सत्कार करावा अशी माझी मनातून इच्छा होती. त्यामुळेच हा योग जुळून आला.शिवारात बहरलेल्या या साहित्य नगरीत सारस्वतांची मांदियाळी जमा झाली होती. प्रतिथयश मंडळींसोबतच नवोदित कवींनी संमेलनात 'जान' भरली. बाजरीची खमंग भाकरी, वरण, मासवडी, भरीत, ठेचा, लोणचे, चक्की या सोबतच साहित्याच्या मेजवाणीने 'तृप्त' झालो.

कार्यक्रमानंतर पोपटराव माझ्या सेंद्रिय शेतीत मनातून रमले. नवीन लावलेला पानमळा, विहीर, कंपाउंड याची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या. भाजीपाला व फळझाडांचे स्वतः फोटो काढले. त्यांचा सहवास व त्यांच्या दिर्घ अनुभवातून मिळालेले मार्गदर्शन नक्कीच अविस्मरणीय आहे. १५० पुरस्कार विजेत्या कृषी उद्योजिका सौ.सीताबाई मोहिते यांनी सांगितलेली संघर्षमय कहाणी प्रेरणादायी होती.

पद्मश्री पोपटराव पवार, सीताबाई मोहिते, प्राचार्य कमलाकर कांबळे,जेष्ठ साहित्यिक दगडुदादा लोमटे, गोरखजी शेंद्रे, प्रा.रमेश गटकळ, मुकुंदराव सोळंके, आप्पासाहेब खोत, स्नेहलताई पाठक आदी सारस्वतांच्या सहवासात कालचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला.

- डॉ.ओमप्रकाश सदाशिव शेटे