From blogs

मधमाशी पालन शेतकऱ्यांच्या उन्नतीचा नवा राजमार्ग

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Jan 22, 2022

गिरणारे जि. नाशिक येथे कालपासून मधमाशी पालन प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ भारतीताई प्रविणजी पवार यांच्या उपस्थित पार पडला. अवघ्या दोनच दिवसांत आमच्या टीमने या भव्यदिव्य कार्यक्रमाचे अप्रतिम नियोजन केले.

बहुसंख्य आदिवासी समाज राहत असलेल्या राज्यातील दुर्गम भागात हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच कार्यक्रम घेण्याचा बहुमान आम्हाला मिळाला याबद्दल प्रास्ताविकात मी जाहीरपणे आनंद व्यक्त केला. परागीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने मधमाश्यांमुळे उत्पादनात वाढ होते. तसेच मधाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊ शकते. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु करायला हरकत नाही.

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गिरणारे येथे आज जीपी फार्ममध्ये मधमाशी पालनावर सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते पार पडले. 

ना.डॉ. भारतीताई पवार यांनी उद्घाटनपर भाषणात मधूक्रांती ची सुरुवात नाशिक मधून होत आहे व महाराष्ट्रात प्रथमच हा कार्यक्रम राबवण्यात आल्यामुळे आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांना मधमाशीपालन हा उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. आणि त्यांना आश्वासन दिले पाहिजे की, भारत सरकारच्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान आणि FPO योजनेंतर्गत मध क्लस्टर्सची निर्मिती यासारख्या योजनांद्वारे सर्वतोपरी मदत केली जाते. जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा अवलंब केल्यास त्यांचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय शेतीचे उत्पन्नही वाढेल. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा मधही उपलब्ध होईल असेही ना. डॉ. पवार म्हणाल्या.

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे प्रादेशिक प्रमुख अनिल हातेकर, प्रशिक्षण सत्रे सुप्रकृती मधुशाला नाशिकचे डॉ. तुकाराम निकम, जे स्वतः शास्त्रज्ञ आणि प्रगतीशील मधमाशीपालक आहेत, शेतकऱ्यांना मधमाशी पालनाच्या शक्यतेची सैद्धांतिक आणि व्यावहारिक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक शेतकरी सहभागी होते. कार्यक्रमाचे संयोजन गोदा कश्यपी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे नितीन गायकर यांनी केले केले. या वेळी वेळी श्री अनिल हाटेकर , श्री तुकाराम निकम,श्री नितिन गायकर -गोदा कश्यपी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, गिरणारे,श्री ऋषिकेश कुमार,

श्री संदीप धीमान, प्रीतम आढाव,एन. डी गावित व पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी,शेतकरी आदी उपस्थित होते. मधमाशी पालन शेतकऱ्यांच्या उन्नतीचा नवा राजमार्ग असून तरुण शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडायला हरकत नाही असे मला वाटते.