From blogs

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत सन्मान हे परम भाग्यच...

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Dec 24, 2021

आज मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे मला सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रथमच भारत गौरव श्री अल्हाज असद बाबा यांच्या नावाने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मात्र माझा हा सन्मान राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या जन्मभूमीत झाला हे मी माझे परम भाग्यच समजतो..!

समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना यावर्षी "प्रथमच भारत गौरव श्री अल्हाज असद बाबा यांच्या नावाने सेवा सन्मान, जीवनगौरव तथा समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प.पु.हजरत भारतगौरव अल्हाज असदबाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत कर्करोग तपासणी तथा उपचार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे ऊदघाटन करण्याचा मानही मिळाला.

आयोजक डॉ.अमजद खान पठाण (कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई), अशपाक खान पठाण (सचिव हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा बहु संस्था मातृतिर्थ सिंदखेड राजा), यांनी सुंदर सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री सुबोध सावजी, पद्मश्री डॉ.आर.के.देशपांडे, अफगाणिस्तानच्या राजदूत जकीया वर्धक, जायंट इंटरनॅशनल नुरुद्दीन शेववाला,श्रद्धेय स्वामी देवेंद्र भाईजी आदी मान्यवारांचा परिचय झाला.

कार्यक्रमापूर्वी तातडीने जाऊन राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक झालो. राष्ट्राला जाणताराजा देणाऱ्या व महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या आईसाहेब ज्या पवित्र वास्तुत खेळल्या-बागडल्या त्या लखुजीराजे जाधव यांच्या वाड्यावर जाऊन तिथली माती कपाळी लावली. यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आदी स्नेहीजन समवेत होते.

- डॉ. ओमप्रकाश स.शेटे